व्यवसायासाठी आलेल्या परप्रांतीयाने स्थानिक तरुणावर केला जीवघेणा हल्ला

Foto

फुलंब्री- फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे व्यावसाय करण्यासाठी आलेल्या एका परप्रांतीय व्यवसायिकाने एका स्थानिक  युवकावर प्राणघातक हल्ला केला .

ही घटना तालुक्यातील आळंद येथे  रविवारी  संध्याकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली .संतोष लक्ष्मण खिल्लारे रा . आळंद तालुका फुलंब्री

असे हल्ल्यातील जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

 

मध्यप्रदेश मधुन आळंद येथे कपडे व  इतर साहित्याचे व्यावसाय करण्यासाठी तब्बल दीडशे ते दोनशे परप्रांतीय लोक आळंद येथे आले असुन , अंधारी रस्त्यालगत एका शेतात राहतात. रविवारी एका शेतात जाऊन  हे लोक सरपण जमा करत असताना त्यांना शेतमालकासह वस्तीवर राहणार्‍या नागरिकांनी सरपण नेऊ नका म्हणून मज्जाव केला असता. या परप्रांतीय लोकांनी गावातील लोकांवर दगडफेक सुरू केली.  या दगडफेकीत संतोष लक्ष्मण खिल्लारे हे जखमी झाले असून . त्यांना जखमी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या हल्ल्यात संतोष गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान  या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली.  गावात तणावाची  परिस्थिती निर्माण झाल्याने वडोदबाजार पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील , राजू तेलगोटे यांनी गावात येऊन  वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यावर रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती अशी माहिती स्थानिक पोलीसांनी दिली .

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker